common wealth games 2022 Saam tv
क्रीडा

CWG 2022 : भारताला मिळाले सुवर्णपदक; मीराबाईने मारली बाजी

बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (common wealth games 2022) भारताच्या मीराबाई चानूने संधीचं सोनं करत वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) महिलांच्या ४९ किलो किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे.

साम टिव्ही ब्युरो

CWG 2022 : बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (common wealth games 2022) भारताच्या मीराबाई चानूने संधीचं सोनं करत वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) महिलांच्या ४९ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. मीराबाईने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर देशभरातून तिचं कौतुक होत आहे. (Mirabai Chanu Commonwealth Games news )

मीराबाई चानूने (Meerabai chanu) स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे ८४ किलो वजन उचलले. मीराबाई चानूने दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या ८८ किलो वजन उचलले. मीराबाईने उत्कृष्ट कामगिरी करत ऑलिम्पिक मधला तिचा रेकॉर्ड मोडला आहे. मात्र, मीराबाईला तिसऱ्या प्रयत्नात ९० किलो वजन उचलता आले नाही.

संकेत सरगरने भारताला मिळवून दिलं सिल्व्हर मेडल

येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (common wealth games 2022) भारताच्या (india) तसेच सांगली जिल्ह्यातील संकेत महादेव सरगर (Sanket Sargar) याने आज (शनिवार) 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये (weightlifting) रौप्य पदक (silver medal) पटकाविले. संकेतच्या यशानं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचं खातं खोललं आहे.

या स्पर्धेत संकेत सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोसाठी 113 किलो आणि क्लीन आणि जर्क 135 किलो वजन उचललं. सुवर्ण कामगिरी करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु हाेते मात्र परंतु दुसऱ्या क्लीन अँड जर्क लिफ्टवर त्यास दुखापत झाली.

मीराबाई चानूने पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी करून भारताची शान वाढवली. मिराबाईने बर्मिंगहॅममध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचा विक्रम केला. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे भारतीय खेळाडूंना चालना मिळेल, असं ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिराबाईचे अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT