rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Statement: 'मी उद्या त्याला...', अक्षरच्या गोलंदाजीवर सोपी कॅच सोडल्यावर काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma On Axar Patel Drop Catch: या सामन्यात अक्षर पटेलला हॅट्रीक घेण्याची संधी होती. मात्र ही संधी थोडक्यात हुकली. दरम्यान ही संधी हुकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव २२८ धावांवर आटोपला होता. हे आव्हान भारतीय संघाने २१ चेंडू राखून पूर्ण केलं. यासह भारताने विजयी सुरुवात केली.

भारताची भेदक गोलंदाजी पाहता बांगलादेशला १०० धावा करण्यासाठीही नाकी नऊ आले असते. मात्र रोहित शर्माच्या एका चुकीमुळे बांगलादेशने २०० धावांचा डोंगर उभारला. बांगलादेशकडून फलंदाजी करताना जाकीर अली आणि तोहीद हृदोयने शानदार १५४ धावांची भागीदारी केली.

मात्र रोहितने जर सोपा झेल सोडला नसता तर बांगलादेशचा डाव स्वस्तात निपटला असता. यादरम्यान अक्षर पटेलला हॅट्रीक घेण्याची संधी होती. मात्र रोहितने झेल सोडल्यामुळे ही हॅट्रीक थोडक्यात हुकली. लाईव्ह सामन्यात रोहित संताप व्यक्त करताना दिसून आला. त्यानंतर त्याने माफीही मागितली.

झेल सोडल्यानंतर रोहित काय म्हणाला?

जर रोहितने जाकीर अलीचा झेल घेतला असता, तर अक्षर पटेल आयसीसी स्पर्धेत हॅट्रीक घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला असता. तर चॅम्पियन्स ट्रॉफीत असा रेकॉर्ड करणारा दुसराच गोलंदाज ठरला असता. दरम्यान सामन्यानंतरही त्याने हटके स्टाईलमध्ये अक्षरची माफी मागितली.

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘ मी उद्या त्याला डिनरला घेऊन जाऊ शकतो. तो एक सोपा झेल होता. मी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना जो स्टँडर्ड सेट केलाय ते पाहता मी तो झेल पकडायला हवा होता.’

तर हॅट्रीकबद्दल बोलताना अक्षर पटेल म्हणाला ,‘ खूप काही झाला, पण मला माहीत नव्हतं की तो आऊट आहे. केएल राहुलने अपील केली आणि तो आऊट झाला. त्यानंतर मला दुसरा विकेट मिळाला. तिसऱ्या चेंडूवर चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये गेला, मी जल्लोष करायला सुरुवात केली. मात्र त्यानंतर मी पाहिलं झेल सुटलाय, चूक सर्वांकडून होऊ शकते.‘

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT