IND VS AUS Saam Tv
Sports

IND VS AUS:टीम इंडियाची चिंता वाढणार! पराभवाचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात महत्वाचा बदल केला आहे.

Saam TV News

IND VS AUS:भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला आहे.

यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या दणदणीत पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघ जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात महत्वाचा बदल केला आहे.(Latest Sports Updates)

या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात मॅथ्यू कुहनेमनची एन्ट्री झाली आहे. मॅथ्यू कुहनेमनला मिशेल स्वेपसनच्या जागी बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

मिशेल स्वेपसन वैयक्तिक कारणास्तव माघारी परतला आहे. त्याला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कारण नॅथन लायन आणि टॉड मर्फीला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली होती.

मॅथ्यू कुहनेम संघात आल्याने पॅट कमिन्सला फिरकी गोलंदाजीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघात ३ फिरकी गोलंदाज खेळताना दिसून येऊ शकतात. तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून पॅट कमिन्स कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघातील अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीन दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, तो दिल्ली कसोटीत पुनरागमन करू शकतो. तो येताच ऑस्ट्रेलिया संघ आणखी मजबूत होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप?

Gadchiroli news: गडचिरोलीत रक्तरंजित थरार, नवऱ्याकडून बायकोवर चाकूने सपासप वार

पावसाळ्यात केस खूप गळतायत? मग आजपासूनच खायला सुरू करा 'हे' 5 पदार्थ

Karjat Fort : कर्जतमध्ये लपलंय भव्य ऐतिहासिक ठिकाण, ३१०० फूट उंच असलेला 'हा' किल्ला पाहायला नक्की जा

Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर

SCROLL FOR NEXT