neerj chopra twitter
Sports

Manu Bhaker Father: नीरज अन् मनू भाकरची आई यांच्यात काय बोलणं झालं? मनूच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

Manu Bhaker Mother Neeraj Chopra Viral Video: मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दरम्यान या व्हिडिओबाबत मनूच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Manu Bhaker Father Clarification On Neeraj Chopra Viral Video: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कांस्य पदक पटकावणारी भारतीय नेमबाज मनू भाकर आणि गोल्डन बॉय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर तिने सरबजोत सिंगसोबत मिळूनही कांस्यपदकाला गवसणी घातली होती.

दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर मनू भाकरच्या आईने नीरज चोप्राची भेट घेतली होती. या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली. दरम्यान आता मनू भाकरच्या वडिलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या आईचा व्हिडिओ व्हायरल

ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकरची आई चर्चा करत होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरअपलोड होताच, मनूची आईची नीरजला लग्नासाठी मागणी घालत आहे, अशा चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर मनू भाकर आणि नीरज चोप्रा चर्चा करत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी, नीरजला मनू भाकरवर क्रश आहे अशी अफवा पसरवायला सुरुवात केली.

काय म्हणाले मनूचे वडील?

मनूचे वडील राम किशन भाकर म्हणाले की, 'मनू अजून खूप लहान आहे. आम्ही तिच्या लग्नाचा विचार करत नाहीये. आम्ही तिच्या अॅथलेटीक कारकिर्दीवर फोकस करण्याचा विचार करतोय.'

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राम किशन भाकर म्हणाले की, ' मनू अजून खूप लहान आहे. तिचं लग्नाचं वय नाही. आम्ही याबाबत काहीच विचार करत नाहीये.' यासह त्यांनी मनू आणि नीरजचं लग्न होणार या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

लग्नाच्या अफवांना पूर्णविराम दिल्यानंतर त्यांनी व्हायरल व्हिडिओबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले की, 'मनूची आई नीरजला आपला मुलासारखं समजते.' मनूच्या वडिलांप्रमाणे नीरजच्या काकांनी देखील व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ' नीरजने रौप्यपदक जिंकलं हे सर्वांना समजलं. त्याचप्रकारे जेव्हा त्याचं लग्न होईल त्यावेळी सर्वांना कळेलच की, नीरजने लग्न केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT