Keshav Maharaj as replacement for injured Mitchell Santner saam tv
Sports

IPL 2026: IPL 2026 : मिचेल सँटनर IPL बाहेर; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हुकमी एक्का

Keshav Maharaj as replacement for injured Mitchell Santner: मिचेल सँटनर दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने केशव महाराजला संघात सामील केलं आहे. खराब कामगिरीमुळे प्लेऑफची शक्यता धोक्यात असून आगामी सामन्यांमध्ये विजय मिळवणं संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली नाहीये. अशातच टीमला मिचेल सँटनरच्या रूपात एक मोठा धक्का बसला. तर आता मुंबई इंडियन्सने २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीग दरम्यान दुखापतग्रस्त मिचेल सँटनरच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा स्पिनर गोलंदाज केशव महाराज याला टीममध्ये सामील करून घेतलंय.

गेल्या सामन्यात सँटरनरला डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सँटनरला संपूर्ण सिझनमधून बाहेर व्हावं लागलंय. केशव महाराज ७५ लाखांमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी झाला आहे.

इंडियन प्रीमियर लीगने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, 'मुंबई इंडियन्सने (MI) मिचेल सँटनरच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर गोलंदाज केशव महाराज याला करारबद्ध केलंय. डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे सँटनर टाटा इंडियन प्रीमियर लीग २०२६ मधून बाहेर झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यात बाऊंड्री लाईनवर कॅच घेण्याचा प्रयत्न करताना सँटनरला ही दुखापत झाली होती.

केशव महाराज एक अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज असून त्याने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सिरीजमध्ये भाग घेतला होता. त्याने २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात असून त्याने दोन आयपीएलचे सामने खेळले आहेत.

महाराज हा दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फॉरमॅटमधील सर्वात अनुभवी स्पिनर गोलंदाजांपैकी एक आहेत. एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना न खेळताही केशव महाराजची २०२१ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली. त्याने श्रीलंकेविरुद्ध कर्णधारपदही भूषवलं होतं. या फॉरमॅटमधील आपल्या पहिल्याच बॉलवर त्याने विकेट घेतली होती.

मुंबईची परिस्थिती बिकट

पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेला मुंबई इंडियन्सच्या टीमची अवस्था यावेळी फारच बिकट आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीमने सात सामन्यांपैकी केवळ दोनच जिंकलेत. त्यामुळे यंदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका मुंबईवर आहे. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आपला पुढील सामना २९ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : फक्त हृदय नाही, तर शरीराच्या 'या' भागांवरही होतो हाय BP चा परिणाम

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

8th Pay Commission: शिक्षकांची बेसिक सॅलरी १.३४ लाख होणार? आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

SCROLL FOR NEXT