Maharashtra Kesari Saam Tv
Sports

Maharashtra Kesari: उद्या मिळेल नवा महाराष्ट्र केसरी; 'या' मल्लांमध्ये रंगणार अंतिम सामनाचा थरार

Maharashtra Kesari : आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली.

Bharat Jadhav

Maharashtra Kesari Final Match:

पुणे जिल्ह्यातील फुलगावात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगलीय. ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली असून उद्या अंतिम लढत पार पडणार आहे. यामध्ये माती विभागात सिंकदर शेख आणि संदीप मोटे तर गादी विभागात हर्षद कोकाटे आणि शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत होईल. यातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाची लढत खेळविली जाईल.

प्रदीप कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. दरम्यान या स्पर्धेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थित मल्लांना संबोधितही केलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वैभव आहे. एक मोठी कुस्तीची परंपरा आहे. खाशाबा जाधव यांच्या रुपाने भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळालं. यावर्षी एशियाड स्पर्धेत भारताला १०० पदकं मिळाली. परंतु महाराष्ट्राच्या कुस्तीला मिळालं नाही,अशी खंत फडणवीस यांनी बोलून दाखवली.

आता आपल्याला विशेष काम कराव लागणार आहे. मागच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आपण मानधन वाढवलं होतं. राज्य सरकार मल्लांच्या पाठीशी उभं राहणारं आहे. ज्या सोयींची आवश्यकता आहे ते आपण करू. मल्लांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरतं मर्यादित राहू नये. जे जे लागेल ते आपण देऊ मात्र ऑलिम्पिक मेडल आणि कॉमनवेल्थचं मेडल मिळालं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

Maharashtra Live News Update : सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT