Lakshya Sen saam tv
Sports

ALL England Badminton Championship: ७६ मिनिटांनंतर लक्ष्य सेनची जियावर मात

आता लक्ष्य सेनकडे अंतिम सामना जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत (ALL England Badminton Championship) भारताच्या लक्ष्य सेनने (Lakshya Sen) अंतिम फेरीत धडक मारली आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यने मलेशियाच्या ली जिया जियाचा (Malaysia's Li Jia Jia) पराभव केला. लक्ष्यने २१-१३ , १२-२१, २१-१९ अशी ली जी जियावर मात केली. हा सामना ७६ मिनिटे चालला. (Lakshya Sen Latest Marathi News)

जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनने पहिला सेट जिंकून सामन्यात शानदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याची लय बिघडली. परिणामी मलेशियाच्या खेळाडूने दुसरा सेट सहज जिंकला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. तिसर्‍या सेटमध्ये एका क्षणी लक्ष्य १२-१६ असा पिछाडीवर होता, पण त्याने शानदार कामगिरी करत सामना जिंकला.

लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या (China) लू गुआंग जूने (Lu Guang Xu) याने पुढे चाल दिली (Walkover) वॉकओव्हर दिला. त्याचवेळी ली जी जियाने जपानच्या केंटो मोमोटाचे (Kento Momota) आव्हान मोडून काढले. याआधी उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनने तिसऱ्या मानांकित अँटोनसेनवर २१-१६, २१-१८ असा विजय मिळवला होता. अँडर्स अँटोनसेन (Anders Antonsen) हा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा पदक विजेता आहे.

आता लक्ष्य सेनकडे अंतिम सामना जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. प्रकाश पदुकोण (१९८०) (Prakash Padukone) आणि पुलेला गोपीचंद (२००१) (Pullela Gopichand) यांच्या व्यतिरिक्त येथे भारतासाठी कोणीही विजेतेपद मिळवलेले नाही. तसेच सायना नेहवाल (Saina Nehwal) २०१५ मध्ये उपविजेती ठरली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या; साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कंपनीला टाळं

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

SCROLL FOR NEXT