kl rahul catch Twitter
Sports

Ind vs Aus: केएल राहुलच्या कॅचने करून दिली धोनीच्या त्या कॅचची आठवण, व्हिडिओ एकदा पाहाच- VIDEO

KL Rahul catch video: आता वनडे मालिकेत संधी मिळताच त्याने एक भन्नाट झेल टिपला आहे.

Ankush Dhavre

KL Rahul: बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. मात्र या मालिकेत भारतीय संघातील फलंदाज केएल राहुलला हवी तशी कामगीरी करता आली नव्हती.

२ सामने झाल्यानंतर त्याला संघाबाहेर केले गेले होते. आता वनडे मालिकेत संधी मिळताच त्याने एक भन्नाट झेल टिपला आहे.

कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यानंतर केएल राहुलला संधी मिळणार की नाही याबाबात प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र कर्णधार हार्दिक पंड्याने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला पहिल्या वनडे सामन्यात प्लेइंग ११ मध्ये संधी दिली आहे. कर्णधाराचा हा विश्वास केएल राहुलने सार्थ ठरवला आहे. (Latest sports updates)

या सामन्यात यष्टिरक्षण करण्याची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. त्याने यष्टिरक्षण करताना एक अप्रतिम झेल टिपला आहे. तर झाले असे की,पहिल्या डावातील १३ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता.

या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत यष्टिरक्षण करत असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. त्याने उजव्या बाजूला डाइव्ह मारत झेल टिपला. हा विडि सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

ऑस्ट्रेलिया संघ -

ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श,स्टिव्ह स्मिथ (कर्णधार),मार्नस लॅबुशेन,जोश इंग्लिस,ग्लेन मॅक्सवेल,कॅमरन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, शॉन एबॉट, मिशेल स्टार्क,अॅडम झम्पा

भारतीय संघ-

शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT