kl rahul  twitter
Sports

KL Rahul Retirement: केएल राहुलचा क्रिकेटला रामराम? व्हायरल पोस्टने खळबळ, नेमकं सत्य काय?

kl rahul retirement news : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्याचं वृत्त व्हायरल होत आहे.

Namdeo Kumbhar

KL Rahul Retirement : भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतचल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. केएल राहुल याच्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हा दावा केला. त्यामध्ये केएल राहुल यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम (KL Rahul Retirement) ठोकल्याचं म्हटले गेलेय. ही बातमी खोटी आहे. केएल राहुल यानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अथवा कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर निवृत्तीबाबत कोणताही माहिती दिलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही बातमी साफ खोटी आहे.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्याचं वृत्त व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे. यामध्ये स्वत: केएल राहुलने क्रिकेटला अलविदा केल्याचा दावा केला जात आहे. पण या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आढळून आलेय.

केएल राहुलच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केएल राहुलने व्यावसायिक क्रिकेटला अलविदा केल्याचा दावा केला जात आहे. पण केएल राहुल याच्या अधिकृत सोशल मीडियावर निवृत्ती संदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

केएल राहुलचं नुकतेच कमबॅक -

विकेटकीपर फलंदाज केएल राहुल यानं टीम इंडियात नुकतेच कमबॅक केलेय. श्रीलंका दौऱ्यावर केएल राहुल याला टीम इंडियात स्थान मिळाले. श्रीलंका दौऱ्यात त्याला छाप सोडता आली नव्हती. आगामी बांगलादेश दौऱ्यात केएल राहुल याला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केएल राहुल यानं भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केएल राहुल यानं टी२० संघातील आपलं स्थान गमावले आहे. कसोटीमध्येही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. केएल राहुल सध्या वनडे संघाचा नियमित भाग असल्याचे दिसतेय. केएल राहुल याचं वय आणि फॉर्म पाहता ते इतक्यात निवृत्ती घेईल, असं दिसत नाही.

डिस्क्लेमर- केएल राहुल याच्या संदर्भातील निवृत्तीची बातमी खोटी आहे. सोशल मीडियावर राहुलच्या नावाने व्हायरल होत असलेल्या पोस्टवर विश्वास ठेवू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT