KL Rahul Twitter
Sports

Ind vs Aus 1st ODI: केएल राहुललाही महाकाल पावले! भन्नाट झेल अन् तुफानी अर्धशतक झळकावत केलं जोरदार कमबॅक

kl rahul in mahakal temple: इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले तर केएल राहुलने ७५ धावांची तुफानी खेळी केली.

Ankush Dhavre

kl rahul batting: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी जोरदार कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

या सामन्यात इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले तर केएल राहुलने ७५ धावांची तुफानी खेळी केली.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये केएल राहुलला संधी दिली गेली होती. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.(Latest sports updates)

त्यानंतर त्याला संघाबाहेर केलं गेलं होतं. आता वनडे मालिकेत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात त्याला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं करून दाखवलं आहे.

या मॅच विनिंग खेळीनंतर सोशल मीडियावर अनेकांचं म्हणणं आहे की, केएल राहुलवर उज्जैनच्या महाकालांची कृपा झाली आहे. केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टीने काही दिवसांपूर्वी उज्जैनच्या महाकाल दरबारी हजेरी लावली होती.

तर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील महाकालचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर विराटनेही ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या चौथ्या कसोटी सामन्यात शतक झळकावत १८७ धावांची खेळी केली होती.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांवर संपुष्टात आणला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाकडून केएल राहुलने नाबाद ७५ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ४५ धावांची खेळी करत भारतीय संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT