KKR vs RCB weather prediction Kolkata knight riders vs royal challengers Bangalore weather news in marathi amd2000 twitter
Sports

KKR vs RCB, IPL 2024: केकेआर - आरसीबी सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

KKR vs RCB Weather Report: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. हे दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. गेल्या वेळी जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते, त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.

कसं असेल हवामान?

हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रंगणार आहे. हा सामना दुपारच्या सत्रात खेळला जाणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा चढलेला असेल. सामन्यावेळी तापमान ४१ डिग्रीच्या आसपास असेल. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता नाही. क्रिकेट फॅन्सला २०-२० षटकांचा रोमांचक सामना पहायला मिळेल.

अशी राहिली आहे कामगिरी..

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

तर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ २ सामने गमवावे लागले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

गेल्या सामन्यात ज्यावेळी हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ६ गडी बाद १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १६.५ षटकात आव्हान पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT