kkr vs pbks  saam tv
Sports

KKR vs PBKS Weather Report: KKR संघाची चिंता वाढवणारी बातमी! पावसामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे सामना होणार रद्द?

Cyclone Mocha IPL: कोलकाता नाईट रायडर्स संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी नीतीश राणाच्या हाती सोपवण्यात आली आहे.

मात्र या संघाला १० पैकी केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. जर या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.

तर पंजाब किंग्ज संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या सामन्यात चक्री वादळाची भिती वर्तवली जात आहे. मोका चक्रीवादळामुळे ( Cyclone Mocha) हा सामना रद्द देखील केला जाऊ शकतो.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळाचा फटका आज होणाऱ्या सामन्यावर होऊ शकतो. असे झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, शनिवारी (६ मे) बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीवादळ तयार झाले होते. त्याच्या प्रभावाखाली त्या भागात ८ मे (सोमवार) सकाळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आता हळूहळू खोल दाबात विकसित होईल आणि उत्तरेच्या दिशेने सरकेल. (Latest sports updates)

पाऊस पडण्याची शक्यता?

तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द पंजाब किंग्ज यांच्यात होणाऱ्या सामन्यात पाऊस पडणार नाहीये. या सामन्यावर चक्रीवादळाचा परिणाम होऊ शकतो. मात्र पावसामुळे कुठलाही परिणाम होणार नाहीये.

मात्र आज कोलकाताच्या आसपास असलेल्या परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी असु शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11:

पंजाब किंग्ज:

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि ऋषी धवन.

कोलकाता नाईट रायडर्स:

जेसन रॉय, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi Kheer Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? फक्त १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर

Gayatri Datar Photos: गायत्री दातारचं सौंदर्य, पाहताच जीव दंगला, रंगला...

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्यासोबत उठणं बसणं सुरुच राहणार - राज ठाकरे

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कोणी केला?

Rohit Arya:'शिक्षणमंत्र्यांनी' 2 कोटी थकवल्याचा आरोप; रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकर काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT