virender sehwag saam tv
Sports

विरेंद्र सेहवागची भीती वाटायची; KKRच्या 'या' दिग्गज खेळाडूची कबुली

नरेश शेंडे

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल मोसमात (IPL 2022) अनेक सामने रंगतदार होत असल्याने क्रिकेटप्रेमींचंही मनोरंजन होत आहे. तसंच आतपर्यंत झालेल्या लढतींमध्ये काही सामने अतीतटीचे झाल्याने प्रेक्षकांच्याही भुवयाही उंचावल्या आहेत. आयपीएलच्या अशा सामन्यांच्या चर्चा सर्वत्र रंगत असतानाही केकेआरच्या ( KKR) एका दिग्गज खेळाडूनं नव्या विषयाला सुरुंग लावलाय. दहा वर्षांपासून केकेआरसाठी खेळणाऱ्या सुनिल नारायणने (Sunil Narine) भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागबाबत (virender sehwag) एक मोठा खुलासा केला आहे.

माझ्या फिरकी गोलंदाजीवर सेहवागची फटकेबाजी

केकेआर आणि राजस्थान रॉयलमध्ये यांच्यातील सामन्यापूर्वी सुनिल नारायणला एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुमच्या फिरकी गोलंदाजीवर कोणता खेळाडू आक्रमकपणे खळतो, असं नारायणला विचारण्यात आलं. त्यावेळी सुनिल नारायणने विरेंद्र सेहवागचं नाव घेत तो एक अप्रतिम फलंदाज असल्याचं सांगितलं. नारायण म्हणाला, विरेंद्र सेहवाग आक्रमक फलंदाजी करायचा. सेहवागविरोधात गोलंदाजी करणं सोपं नव्हत. सामन्यात कशीही परिस्थिती असो, सेहवाग हा त्याच्या फलंदाजीने नेहमीच धावा कुटायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT