नीरज चोप्रासह अन्य दिग्गजांना खेळातील मानाच्या पुरस्काराने केले सन्मानीत 
Sports

नीरज चोप्रासह अन्य दिग्गजांना खेळातील मानाच्या पुरस्काराने केले सन्मानीत

क्रिकेटपटू शिखर धवनला (Shikhar Dhawan) साल २०२१ च्या अर्जून पुरस्कराने (Arjun Award) सन्मानीत करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था

क्रिकेटपटू शिखर धवनला (Shikhar Dhawan) साल २०२१ च्या अर्जून पुरस्कराने (Arjun Award) सन्मानीत करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिखर धवनने मागच्या वर्षात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला अर्जून पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रमोद भगत (पॅरा-बॅडमिंटन), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल) आणि मनप्रीत सिंग (हॉकी) यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला देखील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पॅरा बॅडमिंटनपटू आणि गौतम बुद्ध नगरचे डीएम, सुहास ली यांना नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून अर्जुन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

हॉकीपटू मोनिका आणि वंदना कटारिया, कबड्डीपटू संदीप नरवाल आणि नेमबाज अभिषेक वर्मा यांना देखील अर्जुन पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला आहे. बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन, हॉकीपटू श्रीजेश पीआर, पॅरा नेमबाज अवनी लेखरा आणि पॅरा-अॅथलीट सुमित अंतील यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. कुस्तीपटू रवी कुमार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

SCROLL FOR NEXT