kolhapur saam tv
Sports

Swapnil Kusale: स्वप्नील कुसाळेच्या मिरवणुकीत गोंधळ; पोलिसांकडूनच पत्रकारांना धक्काबुक्की, पाहा VIDEO

Journalist Pushed By Police In Swapnil Kusale Rally: स्वप्नील कुसाळे कोल्हापूरात परतल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान या मिरवणुकीत पोलिसांकडूनच पत्रकारांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने भारताला तिसरं पदक जिंकून दिलं होतं. स्वप्नीलने २५ मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावलं होतं. दरम्यान पदक जिंकल्यानंतर तो कोल्हापूरात परतला आहे.

कोल्हापूरात परतल्यानंतर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. दरम्यान मिरवणूक सुरु असताना, पोलिसांचा अतिरेक पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून मायदेशी परतलेल्या स्वप्नीलचं पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं होतं. आज तो कोल्हापूरात दाखल झाला आहे. त्याच्या स्वागतासाठी हजारो फॅन्स उपस्थित होते. मात्र कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला योग्यरित्या नियोजन करता आलेलं नाही. त्याच्या स्वागत यात्रेवेळी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा शून्य कारभार पाहायला मिळाला आहे.

माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की

स्वप्नील कुसाळे कोल्हापूरात परतल्यानंतर,त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान मिरवणुकीतील गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने माध्यम प्रतिनिधींना वार्तांकन करत पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतासाठी जिंकलं कांस्यपदक

स्वप्नील कुसाळेने भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील तिसरं पदक जिंकलं होतं. त्याने २५ मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात हा कारनामा करुन दाखवला होता. स्वप्नीलने पदक जिंकण्यापूर्वी मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. भारताने या स्पर्धेत एकूण ६ पदकं पटकावली. ज्यात ५ कांस्य आणि १ रौप्यपदकाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT