jasprit bumrah  saam tv
Sports

Jasprit Bumrah Injury: जसप्रीत बुमराह यंदाचा वर्ल्डकप खेळणार का? BCCI ने मेडिकल अपडेट दिल्यानंतर आता एकच सवाल...

When Jasprit Bumrah Retun In Action: आता जसप्रीत बुमराहबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Latest Update: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. तो सप्टेंबर २०२२ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

त्यानंतर दुखापतीमुळे त्याला अनेक मोठ मोठ्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. आता त्याच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराहवर काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्याने बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत पुनर्वसन सुरू केले आहे.

तसेच श्रेयस अय्यरवर देखील येत्या काही दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशी माहीती बीसीसीआयने दिली आहे. (Will Jasprit Bumrah Play ODI WC 2023)

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना म्हटले की,'शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो वेदनामुक झाला आहे. काही तंज्ञानी त्याला शस्त्रक्रिया होऊन ६ आठवडे झाल्यानंतर पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार बुमराहने आता पुनर्वसन करायला सुरुवात केली आहे.' (Latest sports update)

जसप्रीत बुमराह २०२३ वर्ल्ड कप खेळणार?

जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला आहे. आता त्याच्या पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आता वर्ल्ड कप खेळणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता आता वाढताना दिसत आहे.

कारण बुमराहला पूर्णपणे फिट होण्यासाठी कमी कमी ६ महिन्यांचा अवधी लागू शकतो. तर वर्ल्ड कप स्पर्धा सुरु व्हायला देखील ६ महिने शिल्लक आहेत.

जर तो या स्पर्धेपूर्वी पूर्णपणे फिट झाला तर त्याला स्वतःची फिटनेस सिद्ध करण्यासाठी काही सराव सामने खेळण्याची संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आयपीएल २०२३ स्पर्धेत देखील खेळताना दिसुन येत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone battery life: मोबाइलची बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगला लावावी?

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT