Jasprit Bumrah Clean bowled Ben Duckett twitter
Sports

IND vs ENG: बॉल टाकलाय की बंदुकीची गोळी! बुमराहच्या भन्नाट गतीसमोर डकेटची दांडी गुल - VIDEO

Jasprit Bumrah Clean bowled Ben Duckett: भारतीय फलंदाजांनी इंग्लंडवर १९० धावांची आघाडी मिळवली. दरम्यान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचा जलवा पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Clean bowled Ben Duckett:

हैदराबादच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडवर १९० धावांची आघाडी मिळवली. दरम्यान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचा जलवा पाहायला मिळाला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावाच फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. दोन्ही संघातील फिरकी गोलंदाजांनी संघाला विकेट्स काढून दिल्या. मात्र सामन्यातील दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने आपला अनुभव पणाला लावत सुरुवातीलाच इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले आहेत. दरम्यान त्याने बेन डकेटला बाद केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

बेन डकेटची दांडी गुल..

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना १९ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचवा चेंडू टप्पा पडताच इतका वळला की, बेन डकेटला काही कळायच्या आत त्याचा ऑफ स्टम्प उडून लांब जाऊन पडला होता. बेन डकेटने संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

त्याने ५२ चेंडूत ७ चौकारांच्या साहाय्याने ४७ धावांची खेळी केली. या आधीच्या षटकातही बुमराहचा चेंडू बेन डकेटच्या पॅडला जाऊन लागला होता. बुमराहने अपील केली. मात्र अंपायरने त्याला नाबाद घोषित केलं. कर्णधार रोहितने केएस भरतला डीआरएससाठी विचारणा केली असता त्याने डीआरएस घेण्यास नकार कळवला. मात्र त्यानंतर मोठ्या स्क्रिनवर तो आऊट असल्याचं दिसून आलं.

जो रुटलाही केलं बाद..

इंग्लंडचा अमुभवी गोलंदाज जो रुटही जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर फार काळ टीकू शकला नाही. २१ व्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला पायचित करत माघारी धाडलं. रुटने डीआरएसची मागणी केली होती. मात्र तो डीआरएसमध्येही तो आऊट असल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Railway Booking : रेल्वेचा मोठा निर्णय! १५ मिनिटे आधीही बुक करता येणार कन्फर्म तिकीट; वाचा A to Z माहिती

Petrol Diesel Price Today: 'या' शहरात पेट्रोल ₹८८.६६ तर डिझेल ८४.५६ रुपये; सरकारी कंपन्यांनी दर घटवले का?

Dadpe Pohe Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट दडपे पोहे; वाचा सोपी रेसिपी

Heart Attack Symptoms : सकाळी उठताच दिसतात हॉर्ट अॅटकची ही ६ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात

SCROLL FOR NEXT