rishabh pant  saam tv
Sports

Rishabh Pant: रिषभ पंतचं world Cup खेळणं कठीण, IPLस्पर्धेलाही मुकणार; टीम इंडियाच्या गोलंदाजाने सांगितलं मोठं कारण

Ishant Sharma On Rishabh Pant: आता भारतीय खेळाडूने असं काही वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ होऊ शकते.

Ankush Dhavre

Rishabh Pant: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त खेळाडूंची मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध केली होती. या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले होते की, रिषभ पंत फिट झाला असुन त्याने फलंदाजी करायला सुरुवात केली आहे.

ही बातमी येताच क्रिकेट चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. मात्र आता भारतीय खेळाडूने असं काही वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ होऊ शकते.

रिषभ पंत हा भारतीय संघातील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. यावर्षी भारतीय संघाला काही महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. येत्या काही दिवसात आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

या दोन्ही स्पर्धा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत. या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रिषभ पंत भारतीय संघात कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता ईशांत शर्माचं म्हणणं आहे की, रिकाय म्हणाला ईशांत शर्मा?

भारत- वेस्टइंडीज दुसरा कसोटी सामना सुरू असताना ईशांत शर्मा म्हणाला की, 'मला असं वाटतं की, आपण रिषभ पंतला आगामी आयपीएल स्पर्धेत खेळताना पाहू शकणार नाही. कारण ही दुखापत गंभीर आहे. त्याच्यासोबत मोठा अपघात झाला होता.

त्याने आता फलंदाजी आणि विकेटकिपिंग करायला सुरूवात केली आहे. आता धावण्यासह आणखी खूप काही गोष्टी आहेत, ज्यावर त्याला काम करावं लागणार आहे. जे एक यष्टीरक्षक फलंदाजासाठी कठीण आहे. (Latest sports updates)

तसेच तो पुढे म्हणाला की, 'चांगली बाब म्हणचे त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली असती तर त्याला दिर्घकाळ संघाबाहेर राहावं लागलं असतं. आता त्याच्यावर केवळ एक शस्त्रक्रिया केली गेली आहे. मला असं वाटतं की, तो वर्ल्डकपसाठी पूर्णपणे फिट होणार नाही. मात्र अशी आशा करतो की तो आयपीएल स्पर्धेपूर्वी फिट होईल.'भ पंत वर्ल्डकप स्पर्धेसह आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेतुनही बाहेर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT