ishan kishan catch  twitter
Sports

Ishan Kishan Catch Video: एकच नंबर भावा! ईशानच्या त्या कॅचने करून दिली थालाची आठवण पाहा VIDEO

Viral Catch Video: पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने भन्नाट झेल टिपून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ankush Dhavre

IND VS WI 1st Test: भारतीय संघाचा डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज ईशान किशनला भारतीय कसोटी संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने भन्नाट झेल टिपून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रिषभ पंतचा अपघात झाल्यानंतर केएस भरतला कसोटी संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र ५ सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. शेवटी टीम मॅनेजमेंटने ईशान किशनला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

ईशानमुळे रिषभच्या कारकिर्दीला लागणार पूर्णविराम?

रिषभ पंतच्या अनुपस्थितीत केएस भरतची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड केली गेली होती. मात्र अनेकदा संधी मिळूनही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. शेवटी टीम मॅनेजमेंटने केएस भरतला संघाबाहेर करून ईशान किशनला संधी दिली आहे.

ईशान किशन या संधीचं सोनं करताना दिसून येत आहे. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आला आहे. आर अश्विनने भारतीय संघाकडून ५ गडी बाद केले. यादरम्यान ईशान किशनने दोन झेल टिपले. यापैकी एक झेल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (Latest sports updates)

चित्त्याच्या चपळाई दखवत टिपला झेल..

वेस्टइंडीजची फलंदाजी सुरु असताना २० वे षटक असताना शार्दूल ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडुवर रेमन रिफरने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत थेट यष्टीरक्षक ईशान किशनच्या हातात गेला.

हा झेल त्याच्या हातात येण्यापूर्वीच त्याने पुढच्या दिशेने डाइव्ह मारली आणि चित्त्याच्या चपळाईने झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

हा झेल पाहून अनेकांना एमएस धोनीची आठवण झाली आहे. ईशान किशनचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. या सामन्यात त्याला केएस भरतच्या जागी संधी दिली गेली आहे. यष्टीरक्षणासहनंतर आता फलंदाजीमध्ये देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT