ishan kishan twitter
क्रीडा

Ishan Kishan: इशान किशनचं टेन्शन वाढलं! हा स्टार खेळाडू जागा घेण्यासाठी तयार; आता कमबॅक करणं कठीण

Ankush Dhavre

भारतीय संघाने नुकताच झालेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभूत केलं. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत आणखी भक्कम स्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

यापूर्वी २ वेळेस भारताने फायनलमध्ये प्रवेश केला. पण दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ यावेळी पूर्ण जोर लावताना दिसून येणार आहे. तर दुसरीकडे इशान किशनला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघ येत्या काही दिवसात न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

या दौऱ्यासाठी गौतम गंभीरने संघ बांधणी करायला सुरुवात केली आहे. मात्र रिषभ पंतचा बॅकअप कोण? हे अजूनही समजू शकलेलं नाही. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत इशान किशनला संधी दिली गेली होती. त्यानंतर ध्रुव जुरेलनेही संधीचं सोनं केलं होतं. त्यामुळे ध्रुव जुरेल भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी इशान किशनपेक्षा एक पाऊल पुढे आहे.

इराणी कपमध्ये शानदार खेळी

लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात ध्रुव जुरेल रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळतोय. या संघाकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शानदार ९३ धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. या खेळीसह त्याने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. तर दुसरीकडे इशान किशनला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

Vastu Tips for Sleeping: झोपतेवेळी बेडजवळ चुकूनही ठेऊ नयेत 'या' गोष्टी; गरीबी पाठ सोडणार नाही!

SCROLL FOR NEXT