ishan kishan  saam tv
Sports

Viral Video: 'तू असशील रांचीचा,पण तू धोनी..' LIVE सामन्यात टोमणा मारणाऱ्या दिग्गजाला ईशानचे रोखठोक उत्तर

Aakash Chopra On Ishan Kishan: एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Ishan Kishan Viral Video:

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे. मालिकेतील तिसरा सामना त्रिनिदादच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यात ईशान किशनने भारतीय संघाकडून अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीसह तो आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, वेस्टइंडीज संघाची फलंदाजी सुरू असताना ईशान किशन यष्टिरक्षण करत होता. त्यावेळी समालोचन करत असलेल्या आकाश चोप्राने ईशान किशनच्या यष्टिरक्षणावर वक्तव्य केलं. त्यानंतर ईशान किशनने भन्नाट उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

आकाश चोप्राच्या टोमण्यावर ईशान किशनचे जोरदार प्रत्युत्तर..

तर झाले असे की, यष्टिरक्षण करत असताना ईशान किशनने वेस्टइंडीजच्या फलंदाजाला यष्टीचीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंपायरने त्याला नाबाद घोषित केले.

ज्यावेळी त्याने बेल्स उडवली त्यावेळी समालोचन करत असलेल्या आकाश चोप्राने म्हटले की, 'ईशान तू रांचीचा असशील,पण तू धोनी नाहीस..' हे बोलताच ईशान किशन म्हणाला की, 'हो ठिक आहे...'त्याचा हा आवाज स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने ५ गडी बाद ३५१ धावा केल्या होत्या.

भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार मारले. तर ईशान किशनने ७७ धावा केल्या. या खेळी दरम्यान ईशान किशनने ८ चौकार आणि ३ षटकार मारले.

या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाला अवघ्या १५१ धावा करता आल्या. या मालिकेत दमदार कामगिरी केल्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT