team india  saam tv
Sports

Team India Playing 11: WTC च्या अंतिम सामन्यासाठी दिग्गजाने निवडली प्लेइंग 11; प्रमुख गोलंदाजाला ठेवलं संघाबाहेर?

Irfan Pathan Playing 11: माजी भारतीय खेळाडूने भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडली आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. या सामना जिंकण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू मैदानावर घाम गाळताना दिसून येत आहेत. भारतीय संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत.

त्यामुळे प्लेइंग ११ मध्ये कोणाला स्थान द्यावं हा प्रश्न भारतीय संघासमोर असणार आहे. दरम्यान माजी भारतीय खेळाडू इरफान पठाणने भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडली आहे.

इरफान पठाणने आपल्या प्लेइंग ११ मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज शुभमन गिलची निवड केली आहे. रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर शुभमन गिल जोरदार फॉर्ममध्ये आहे. गिलने नुकताच झालेल्या आयपीएल स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावली आहे.

तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी विराट कोहलीची निवड केली आहे.

तसेच त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची निवड केली आहे.

त्याने सूर्यकुमार यादवला संघाबाहेर ठेवलं आहे. तसेच यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्याने केएस भरत ऐवजी ईशान किशनची निवड केली आहे. यासह त्याने रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. (Latest sports updates)

अशी आहे इरफान पठाणने निवडलेली प्लेइंग ११ :

रोहित शर्मा,शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन, रविंद्र जडेजा, आर अश्विन/शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT