DC VS CSK
DC VS CSK saam tv
क्रीडा | IPL

IPL Playoffs Scenario: केवळ विजय नव्हे तर दिल्लीविरुद्ध पराभूत होऊनही CSK जाणार प्लेऑफमध्ये! फक्त धोनीला करावं लागेल 'हे' काम

Ankush Dhavre

DC VS CSK,IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

तर प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे.दरम्यान या सामन्यात पराभूत होऊनही चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. कसं ते थोडक्यात समजून घ्या.

चेन्नईचा संघ पराभूत होऊनही जाऊ शकतो प्लेऑफमध्ये...

आज होणारा सामना हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा चेन्नईचा साखळी फेरीतील शेवटचा सामना असून, चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे.

चेन्नईचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये १३ पैकी ७ सामने जिंकून १५ पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ १० पॉईंट्ससह नवव्या स्थानी आहे. दरम्यान आज होणारा सामना जिंकून १७ पॉईंट्ससह चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.

मात्र जर आज होणारा सामना चेन्नईने गमावला तरीदेखील चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. त्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. (Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, १३ पैकी ७ सामने जिंकून १४ पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. तर मुंबईचा संघ १३ पैकी ७ सामने जिंकून १४ पॉईंट्ससह सहाव्या स्थानी आहे.

मुंबईचा सामना सनरायझसर्स हैदराबाद संघासोबत रंगणार आहे.तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना गुजरात टायटन्स संघासोबत रंगणार आहे. या सामन्यांमध्ये जर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ पराभूत झाला तर, चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

चेन्नई सुपर किंग्ज:

डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, मथीशा पाथीराना, महेश थिक्षणा, तुषार देशपांडे.

दिल्ली कॅपिटल्स:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), रिली रोसो, अमन खान, यश धुल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, एनरिक नॉर्टजे आणि खलील अहमद.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple | उज्ज्वल निकम उमेदवारीनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Maharashtra Politics | माढ्यात Sharad Pawar गटाला धक्का! Dhaval Singh Mohite Patil भाजपमध्ये जाणार?

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा पश्चिम महाराष्ट्रात धडाका

Sharad Pawar Speech : इथून पुढे मातीची कुस्ती कमी होईल, मॅटवरचा सराव हवा; शरद पवारांचा राज्यातील कुस्तीपटुंना सल्ला

Dinner: रात्री जेवण केले नाही तर काय होईल?

SCROLL FOR NEXT