IPL Schedule saam tv
Sports

IPL Schedule : १२ ठिकाणं, ५० सामने, ८ डबल हेडर मॅच; आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

ipl 2026 second phase schedule 50 matches 12 venues : बीसीसीआयनं आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक घोषित केलं आहे. लीग स्टेजचे उर्वरित ५० सामने १३ एप्रिलपासून २४ मेपर्यंत खेळवण्यात येतील.

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2026) च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. आता दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांची घोषणा केली आहे. दुसरा टप्पा १३ एप्रिलपासून सुरू होईल. तो २४ मे पर्यंत असेल. एकूण १२ ठिकाणांवर सामने होतील.

आयपीएल २०२६ च्या १९ व्या पर्वाचा शुभारंभ शनिवार, २८ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना बेंगळुरूत होईल. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दिग्गज संघांमध्ये पहिलीच लढत होईल. तत्पूर्वी ११ मार्चला बीसीसीआयनं सुरुवातीच्या २० सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन बलाढ्य संघ दुसऱ्या टप्प्यात दोनदा आमनेसामने येतील. १३ एप्रिलपासून हा दुसरा थरारक टप्पा सुरू होईल.

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. हैदराबादमध्ये हा सामना होईल. तर आयपीएलमधील दोन बलाढ्य संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात २३ एप्रिलला मुंबईत, तर २ मे रोजी चेन्नईमध्ये लढत होईल. स्पर्धेच्या या दुसऱ्या टप्प्यात एकूण आठ डबल हेडर सामने होतील.

१२ ठिकाणी रंगणार आयपीएल सामन्यांचा थरार

आयपीएलच्या दुसऱ्या टप्पा १३ एप्रिल ते २४ मे या कालावधीत पार पडेल. भारतात १२ ठिकाणी या टप्प्यातील सामने होतील. यात एकूण ५० सामने खेळवण्यात येणार आहेत. बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड या शहरांमध्ये या लढती होतील.

लीग स्टेजमधील अखेरच्या टप्प्यातील सामने रंगतदार होतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. लीग स्टेजच्या अखेरच्या आठवड्यात सर्व संघ प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी जीवाचं रान करतील. दुसऱ्या टप्प्यात आठ डबल हेडर सामने होतील. दुपारी साडेतीन आणि संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्यांना सुरुवात होईल. पंजाब किंग्ज होम ग्राउंडवरचे सामने न्यू चंदीगड आणि धर्मशालामध्ये खेळेल. धर्मशालेत तीन सामने होतील. राजस्थान रॉयल्स जयपूरमध्ये चार सामने खेळणार आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरू संघ बेंगळुरूच्या मैदानात तीन, रायपूरमध्ये दोन सामने खेळणार आहे. प्ले ऑफच्या सामन्यांची ठिकाणं पुढील काळात जाहीर करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पेट्रोल व डिझेलसाठी घाबरून गर्दी करू नका, पुणेकरांना आवाहन

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! भारतात लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी येणार? VIDEO

अमरावती-नागपूर महामार्गावरील सर्व पेट्रोल पंप बंद, शिर्डीतही अवस्था गंभीर, कुठं नेमकी काय स्थिती?

पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल केली, अन् गाडीच पेटली, अंबरनाथमधील घटना

तळीरामांची मज्जाच मज्जा; आता पेट्रोल पंपवरही मिळणार दारू, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT