IPL Full Schedule IPL /X
Sports

IPL Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, या तारखेला पहिला सामना; कोणत्या तारखेला कोण भिडणार? वाचा

ipl 2026 schedule announced first match rcb vs srh on march 28 : आयपीएल २०२६ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी पहिला सामना शनिवारी, २८ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. उर्वरित सामन्यांबाबत बीसीसीआय लवकरच अपडेट देणार आहे.

Nandkumar Joshi

टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर सर्वाधिक उत्सुकता असलेल्या आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिला सामना कधी सुरू होणार? याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, आता तो दूर झाला आहे. आयपीएल स्पर्धेचे संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले आहे. बीसीसीआयने पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिला सामना शनिवारी, २८ मार्च रोजी होणार आहे. पहिल्या शनिवारी आणि रविवारी फक्त एकच सामना खेळवला जाणार आहे. या दोन दिवशी डबल हेडरचे सामने होणार नाहीत.

बेंगळुरूत RCB vs SRH लढत

बीसीसीआयने आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २८ मार्च ते १२ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक आहे. लवकरच उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. पहिला सामना आयपीएल चॅम्पियन आरसीबी विरुद्ध एसआरएच म्हणजेच बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद यांच्यात होईल.

बेंगळुरूत हा सामना खेळवला जाईल. रविवारी मुंबईत मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत होईल. यंदाच्या आयपीएलमधील पहिला डबल हेडर ४ एप्रिलला होईल. दुपारी तीन वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असतील. तर संध्याकाळी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात काट्याची टक्कर होईल.

१२ एप्रिलला दोन सामने

१२ एप्रिल रोजी रविवारी दोन सामने होतील. पहिला सामना दुपारी तीन वाजता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स म्हणजेच SRH vs LSG यांच्यात होईल. त्यानंतर याच दिवशी संध्याकाळी सात वाजल्यापासून आरसीबी विरुद्ध सीएसके म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होईल. आतापर्यंत १२ एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईत लढत होणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

NCP: आधी पार्थ खासदार, आता जय पवारांकडे मोठी जबाबदारी; सुनेत्रा पवारांनी सूत्रे फिरवली

Metro 9 And Metro 2B: मुंबईकरांची प्रतिक्षा कायम! मेट्रो ९ अन् 2B चे उद्घाटन लांबणीवर; कारण काय?

Cyber Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! मुंबईतील न्यायमूर्तींना एपीके फाईल पाठवून गंडवलं, नेमकं घडलं काय?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षानंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

SCROLL FOR NEXT