IPL Point Table: 
Sports

IPL Point Table: पावसामुळे IPLच्या पॉईंट्स टेबलवर मोठी उलटफेर; कोणत्या संघाचं बिघडलं गणित? कोण-कोणत्या संघाच्या पॉईंट्सवर फेरलं पाणी

IPL Point Table: आयपीएल २०२६ चा १२वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. मात्र पावसामुळे ३.४ षटकांनंतर सामना थांबवण्यात आला आणि नंतर रद्द करण्यात आला. यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे.

Bharat Jadhav

  • पावसामुळे KKR vs PBKS सामना रद्द

  • फक्त 3.4 षटके खेळल्यानंतर खेळ थांबला

  • दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जाणार होता. केकेआर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या ३.४ षटकांचा डाव झाला असताना केकेआरने २ गडी बाद २५ धावा केल्या होत्या. डाव रंगात आला असतानाच पावसानं खोडा घातला अन् त्यामुळे सामना रद्द करावा लागला. पावसाच्या या अनपेक्षित बॅटिगमुळे दोन्ही संघाच्या गुणांवर परिणाम झाला. पॉईंट्स टेबलवर काय उलटफेर झाला ते जाणून घेऊ.

दरम्यान ६ एप्रिल रोजी कोलकातामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, ज्यामुळे सामना रद्द होण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय हवामान विभागाच्या मते, कोलकातामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष करत सामना सुरू करण्यात आला, पण शेवटी सामना रद्द झाला. पंजाब किंग्सविरुद्ध केकेआरची सुरुवातही खराब झाली. चौथ्या षटकापर्यंत केकेआरने अवघ्या २२ धावांत दोन गडी गमावले होते. त्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला.

पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

दरम्यान हा सामना रद्द झाल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. तर सामना रद्द झाल्यामुळे केकेआर आणि पंजाब किंग्सच्या संघाला प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. आता पंजाब किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.

तर कोलकाता नाइट रायडर्सने आपले खाते उघडले असून ते एका स्थानाने वर चढून आठव्या क्रमांकावर आले आहेत.सामना रद्द होण्यापूर्वी अव्वल स्थानी असलेला आरसीबी संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स पॉईंट्स टेबलच्या तळाशीच आहे.

असा आहे इतर संघाची क्रमवारी

पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर, तर दिल्ली कॅपिटल्स चौथ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद पाचव्या स्थानावर कायम आहे, तर मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानावर कायम आहे. लखनौ सुपर जायंट्स देखील सातव्या स्थानावर कायम आहे. पण केकेआरच्या एका पॉईटमुळे गुजरात टायटन्स एका स्थानाने खाली येत नवव्या स्थानावर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला कायद्यापुढे झुकावंच लागलं - तृप्ती देसाई

Gold Mangalsutra Designs: सोन्याच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, गळ्यात दिसतील शोभून

Thane Water supply : ऐन उन्हाळ्यात ठाण्यात पाणीबाणी; 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कोणत्या भागात?

भीषण अपघातात आई-वडिलांचा जागीच मृत्यू, 6 वर्षाच्या मुलीचे छत्र हरपले; मन हेलावून टाकणारी घटना

New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता एप्रिलचा पगार येणार कमी; मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार; कारण काय?

SCROLL FOR NEXT