mumbai indians twitter
Sports

IPL 2025, Mumbai Indians Schedule: MI vs CSK एकदा नाही, तर दोनदा भिडणार? पाहा मुंबई इंडियन्सचं संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Indians IPL 2025 Full Schedule: आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचे सामने केव्हा, कधी आणि कोणत्या संघासोबत होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आलाच. आयपीएल २०२५ स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना २२ मार्चला गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये होणार आहे.

तर ५ वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सचा संघ आपला पहिला सामना २३ मार्चला खेळणार आहे. दरम्यान केव्हा होणार मुंबई इंडियन्सचे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक. (Mumbai Indians IPL 2025 Schedule)

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ आपला पहिला सामना २३ मार्च रोजी खेळणार आहे. मुंबईचा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर मुंबईचा पुढील सामना २९ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. तर मुंबईचा संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना १५ मे ला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे.

मुख्य बाब अशी की यावेळी क्रिकेट फॅन्सला एकदा नव्हे, तर दोनदा मुंबई विरुद्ध चेन्नई असा सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील पहिला सामना २३ मार्चला, तर दुसरा सामना २० एप्रिल रोजी होणार आहे.

कसं आहे मुंबई इंडियन्स संघाचं संपूर्ण वेळापत्रक?

२३ मार्च, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, चेन्नई

२९ मार्च, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद

३१ मार्च, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई

४ एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, लखनऊ

७ एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई

१३ एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली

१७ एप्रिल , मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद ,मुंबई

२० एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई

२३ एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, हैदराबाद

२७ एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई

१ मे, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, जयपूर

६ मे, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई

११ मे, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, धरमशाळा

१५ मे, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Maharashtra News Live Update: नंदूरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाणीसाठात झपाट्याने घट

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

SCROLL FOR NEXT