Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru  
Sports

IPL 2025 GT vs RCB: कोहलीचा फ्लॉप शो! परदेशी खेळाडूंनी वाचवली लाज; लिव्हिंगस्टन आणि टीम डेव्हिडची तुफानी फलंदाजी

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) हे संघ IPL 2025 च्या 14 व्या सामन्यात आमनेसामने आहेत.

Bharat Jadhav

IPL २०२५चा १४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळला जातोय. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आलेत. गुजरात संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराज आणि साई किशोरने आरसीबीचा कंबरडं मोडलं. यंदाच्या सीझनमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या आरसीबीसाठी आजचा दिवस खराब राहिला. मोठी धावसंख्या करण्याच्या उद्देशाने उतरलेल्या आरसीबीने २०षटकात १६९ धावा करत गुजरातसमोर १७० धावांचे आव्हान ठेवले आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्याच षटकात विराट कोहलीच्या रूपाने आरसीबीला पहिला धक्का बसला. अवघ्या ७ धावा करून कोहली अर्शद खानचा बळी ठरला. यानंतर तिसऱ्याच षटकात देवदत्त पडिकलला सिराजने बोल्ड केले. त्यानंतर ५व्या षटकात फिल सॉल्टला सिराजने बाद केले. इशांतने ७व्या षटकात कर्णधार रजत पाटीदारला आपला बळी बनवले.

यानंतर जितेश शर्माने जबाबदारी स्वीकारली आणि ३३ धावांची खेळी खेळली. पण तोही १३ व्या षटकात बाद झाला. मात्र यानंतर लिव्हिंगस्टनने तुफानी खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याचवेळी टीम डेव्हिडनेही शानदार फलंदाजी केली. या जोरावर आरसीबीने २० षटकांत ८गडी गमावून १७० धावा केल्या.

चिन्नास्वामी या स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण ९५ सामने खेळले गेलेत. या स्टेडियमचा रेकॉर्ड खूप धक्कादायक आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४१ सामने जिंकलेत. तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ५०वेळा विजय मिळवलाय. हे झालं फलंदाजी आणि गोलंदाजीविषयी आता नाणेफेक बाबतही या स्टेडियमचा इतिहास पहा. या स्टेडियमवर ज्या कर्णधाराने त्याचा विजय पक्का समजला जातो. आतापर्यंत नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराने ५० वेळा सामना जिंकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT