ipl 2024 srh vs mi hardik pandya and akash ambani chat video viral  twitter
Sports

Hardik Pandya Viral Video: मैदानावर असं काय घडलं? की हार्दिकला पळ काढावा लागला..पाहा Video

SRH vs MI, IPL 2024: मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Viral Video:

मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स संघावर ३१ धावांनी विजय मिळवला आहे. या सुमार कामगिरीनंतर कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रोल केलं गेलं आहे.

हार्दिक पंड्याला कर्णधारपद दिल्यापासून मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाराज असल्याचं दिसून आले आहेत. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात त्याला गुजरातच्या फॅन्सकडून ट्रोल केलं गेलं होतं. असेच काहीसे चित्र हैदराबादच्या मैदानावर पाहायला मिळाले आहे. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सने देखील हार्दिक पंड्याच्या विरोधात घोषणा दिल्या दिल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. तर झाले असे की, मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या सीमारेषेजवळ उभा होता. त्यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी रोहित - रोहितच्या घोषणा दिल्या. त्यावेळी हार्दिक पंड्या आणि आकाश अंबानी हे दोघेही चर्चा करत होते. मात्र फॅन्सच्या घोषणा ऐकून हार्दिक आकाश अंबानी हार्दिक पंड्याला काहीतरी म्हणाला. ते ऐकून हार्दिक पंड्याने ड्रेसिंग रूमच्या दिशेने धाव घेतली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २७७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान हा सामना मुंबईला ३१ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Momos Recipe: मैदा नाही तर गव्हापासून बनवा पौष्टिक मोमोज, सोपी रेसिपी वाचा

Salman Khan: सलमान खान गुन्हेगार आहे...; दबंग दिग्दर्शकाने खान कुटुंबावर लावले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

Liquor License : नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने नाही | पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT