ipl 2024 prize money  saam tv
Sports

IPL 2024: विजेत्या, उपविजेत्या संघावर होणार पैशांचा वर्षाव; ऑरेंज, पर्पल कॅप पटकावणाऱ्यांना किती रक्कम मिळणार?

IPL 2024 Prize Money: आयपीएल २०२४ स्पर्धा जिंकणाऱ्या आणि उपविजेत्या संघाला किती रक्कम मिळणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Ankush Dhavre

क्वालिफायर २ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करत सनरायझर्स हैदराबादने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना २६ मे रोजी चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरुवात होईल.

दरम्यान स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला, अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला, पर्पल कॅप, ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या खेळाडूंना किती रक्कम मिळणार? जाणून घ्या.

विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?

या स्पर्धेतील विजेत्या संघाला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला १३ कोटी रुपये दिले जाणार आहेत. विजेत्या, उपविजेत्यासह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघावरही पैशांचा वर्षाव केला जाणार आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या संघाला ७ कोटी आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघाला ६.५ कोटी रुपये दिले जाणार आहे. या यादीत राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे या संघाला ७ कोटी रुपये तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला ६.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.

ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या फलंदाजाला किती रक्कम मिळणार?

ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या खेळाडूला १५ लाख रुपये दिले जाणार आहेत. सध्या विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने ७४१ धावा केल्या आहेत. इतर कुठलाही फलंदाज त्याच्या आसपासही नाही. त्यामुळे विराट कोहली यावेळीही ऑरेंज कॅपचा मानकरी ठरेल.

पर्पल कॅप पटकावणाऱ्या गोलंदाजाला किती रक्कम मिळणार?

सध्या पंजाबचा गोलंदाज हर्षल पटेल या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने १४ गडी बाद केले आहेत. तर बुमराहने १३ गडी बाद केले आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या वरुण चक्रवर्तीला आणि नटराजनला पर्पल कॅप पटकावण्याची संधी असणार आहे. दोघांनी प्रत्येकी १३- १३ गडी बाद केले आहेत. फायनलमध्ये २ गडी बाद करताच दोघेही पुढे जाऊ शकतात. पर्पल कॅप पटकावणाऱ्या गोलंदाजाला १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT