kkr vs srh head to head record saam tv
Sports

IPL 2024 Final, KKR vs SRH: अब की बार KKR ? की SRH मारणार बाजी? वाचा कोण कोणावर पडणार भारी

KKR vs SRH, Head To Head Record: आयपीएलच्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. १७ व्या हंगामातील फायनलचा थरार चेन्नईतील चेपॉकवर रंगणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने पॅट कमिन्मच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं. तर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला.दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा हेड टू हेड रेकॉर्ड पहिला, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचं पारडं जड असल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही संघ एकूण २७ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने १८ सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबादला ९ सामने जिंकता आले आहेत.

गेल्या ८ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला अय्यर ब्रिगेडने ६ सामने जिंकले आहेत. या हंगामातील दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं पारडं एकतर्फी झुकल्याचं दिसून येत आहे.

कोण मारणार बाजी?

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी झालेल्या ३ पैकी २ फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये ज्यावेळी गौतम गंभीर कर्णधार होता. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. तर हैदराबादने २०१६ मध्ये ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर हा हैदराबादचा कर्णधार होता.

असे आहेत दोन्ही संघ :

सनरायझर्स हैदराबाद:

जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यम, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, पॅट कमिन्स (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव , एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, वानिंदू हसरंगा, नितीश रेड्डी, मार्को जान्सेन, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग

कोलकाता नाईट रायडर्स:

श्रेयस अय्यर, केएस भरत, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, आंग्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रहमान, वैभव अरोरा, चेतन अरोरा, चेतन राणा, वेंकटेश अय्यर. , सुयश शर्मा, मिचेल स्टार्क.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडाच्या वादाचा दुसरा अंक; शिवसेना भाजपामध्ये सुप्त संघर्ष

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

SCROLL FOR NEXT