IPL LSG IPL Twitter
Sports

IPL 2023 LSG vs DC: लखनौचं दिल्लीसमोर 194 धावांचं आव्हान; काइल मेयर्सची धडाकेबाज खेळी

IPL 2023 LSG vs DC: पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौने 193 धावांचा डोंगर उभारला आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023 LSG vs DC : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाताली तिसरा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सुरु आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौने 193 धावांचा डोंगर उभारला आहे. दिल्लीसमोर विजसाठी 194 धावांच तगडं आव्हान ठेवलं आहे. (Cricket News)

लखनौकडून वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने धडाकेबाज खेळी करत 38 चेंडूत सर्वाधिक 73 धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारले. लखनौची सुरुवात काहीशी खराब झाली. कारण संघाचा कर्णधार केएल राहुल पावर प्लेमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये अवघ्या 8 धावांवर बाद झाला. (Latest sports updates)

त्यानंतर तर मेयर्सने दीपक हुडासोबत 69 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केलं. दीपक हुडाने 17 धावांची खेळी केली. त्यानंतर क्रुणाल पांड्या 15, मार्कस स्टॉयनिस 12 धावांवर बाद झाले. निकोलस पूरनने मधल्या फळीत येत 21 धावांत 36 धावांची खेळी करत संघावरील दबाव काहिसा कमी केला. सामन्याच्या शेवटी आयुष बदोनीने 7 धावांत 18 धावांची खेळी केली. यात त्याने एक चौकार आणि दोन षटकार लगावले.

दिल्लीकडून खलील अहमद आणि चेतन सकारिया यशस्वी गोलंदाज ठरले. दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर अक्सर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT