MS Dhoni Retirement Reaction IPL 2023 Saam TV
Sports

MS Dhoni Retirement: निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ; विजयानंतर काय म्हणाला महेंद्रसिंग धोनी?

MS Dhoni Retirement News: धोनीने या मोठ्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रोडक्शनमध्ये हर्षा भोगलेला आपल्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली.

Satish Daud

MS Dhoni Retirement News: ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेची धुव्वाधार फलंदाजी त्यांना इतर फलंदाजांनी दिलेली चांगली साथ आणि शेवटच्या षटकात रविंद्र जडेजाने केलेल्या फटकेबाजीमुळे महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले.  (Latest sports updates)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी १५ षटकात १७१ धावांचं आव्हान मिळालं होतं. चेन्नईने हे आव्हान शेवटच्या बॉलवर चौकार ठोकून पूर्ण केलं. सर रविंद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. (Indian Premier League 2023)

शेवटच्या दोन चेंडूत चेन्नईला विजयासाठी १० धावांची गरज असताना जड्डूने षटकार आणि चौकार ठोकत सनसनाटी विजय मिळवून दिला. चेन्नईने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पाचव्यांदा आयपीएल टॉर्फी जिंकण्याची कामगिरी केली. धोनीने या मोठ्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रोडक्शनमध्ये हर्षा भोगलेला आपल्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली.

निवृत्तीबाबत महेंद्रसिंग धोनीची प्रतिक्रिया

“माझी निवृत्ती जाहीर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मला जेवढे प्रेम मिळाले आहे, इथून निघून जाणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याहून (Cricket News)  कठीण गोष्ट म्हणजे 9 महिने मेहनत करून पुन्हा आयपीएल खेळण्याचा प्रयत्न करणं. हे माझ्याकडून एक भेट असेल, शरीरासाठी ते सोपं होणार नाही” अशी धोनीने प्रतिक्रिया दिली.

चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याचा धावता आढावा

आयपीएलच्या फायनल सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २१४ धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी आधी २१५ धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र चेन्नईच्या बॅटिंगला (Sport News) सुरुवात झाल्याच्या ३ बॉलनंतर पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार १५ ओव्हर्समध्ये विजयासाठी १७१ धावांच सुधारित आव्हान मिळालं. हे आव्हान चेन्नईने ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT