IPL 2023 Saam Tv
Sports

IPL2023 MI VS CSK: मुंबईला सूर गवसणार की 'चेन्नई' किंग ठरणार? IPL मध्ये आज हायहोल्टेज सामना; पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग ११

IPL 2023: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

Gangappa Pujari

Mumbai Indians Vs Chennai Superkings: इंडियन प्रिमियर लीग (IPL 2023) च्या यंदाच्या पर्वाला दिमाखात सुरूवात झाली आहे. आजपासून आयपीएलमधील दुहेरी हेडर सामने खेळवले जाणार आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्समध्ये रंगणार आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. मुंबई- चे्न्नईमध्ये होणारा हा सामना आयपीएलमधील ऐतिहासिक सामना ठरणार आहे. कारण हा आयपीएलचा १००० वा सामना असणार आहे.

चेन्नईचा तिसरा सामना...

यंदाच्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्सचा हा तिसरा सामना असेल. चेन्नई संघाने एक सामना जिंकला असून एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव केला.

मुंबई इंडियन्स विजयाच्या प्रतिक्षेत..

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) यंदाच्या मोसमातील हा दुसरा सामना असेल. अद्याप मुंबई संघाला खातं उघडता आलेलं नाही. मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 मधील पहिल्या विजय शोधात आहेत. पहिल्या सामन्यात मुंबईचा बंगळुरूकडून पराभव झाला होता. या सामन्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन हे बंगळुरूच्या खेळपट्टीवर फ्लॉप ठरले होते.

CSK Playing XI : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), दीपक चहर, आरएस हंगरगेकर

MI Probable Playing XI : मुंबई संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ह्रतिक शोकीन, नेहाल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, पियुष चावला, अर्शद खान, ईशान किशन (विकेटकीपर), जोफ्री आर्चर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडच्या वादाचा दुसरा अंक; राष्ट्रवादी भाजपमध्ये सुप्त संघर्ष

SCROLL FOR NEXT