IPL 2022 Saam TV
Sports

IPL 2022: आजपासून क्रिकेटचा महारणसंग्राम; दोन भारतीय दिग्गज आमने-सामने

वानखेडे स्टेडियमची (Wankhede Stadium) खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पुरक आहे.

वृत्तसंस्था

यंदाच्या हंगामातील पहिला सामना आज होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट राइडर्स (CSK vs KKR) यांच्यात हा सामना रंगणार आहे. सीएसकेचा सामना रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja), आणि कोलकाताचा कर्णधार श्रेयश अय्यर (Shreyash Iyer) आमने-सामने असणार आहेत. हंगामा सुरु होण्यापुर्वीच एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नईचे कर्णधार पद सोडले आणि सर्वांना धक्का दिला आहे. आता संघाची मदार रविंद्र जाडेजाच्या खांद्यावरती असणार आहे. तर कोलकातालाही यंदा नवा कर्णधार मिळाला आहे.

वानखेडे स्टेडियमची (Wankhede Stadium) खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पुरक आहे. वानखेडे वरती १८० धावसंख्या आरामशीर होते. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करतानाही संघांना मदत होते. लहान चौकार आणि वेगवान आउटफिल्ड फलंदाजांना फायदा देईल. येथे होणाऱ्या सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळत असते. सुरुवात चांगली झाली तर येथे 200 धावांचे लक्ष्य गाठणे सोपे जाते.

संभाव्या प्लेईंग - ११

CSK - ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने, प्रशांत सोलंकी

KKR - व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, मोहम्मद नबी, सुनील नारायन, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदाच्या हंगामातील सर्व सामने मुंबई, पुण्यात होणार आहेत. प्लेऑफचे सामने गुजरातमध्ये होणार आहेत. मागचे दोन्ही हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विनाप्रेक्षक गेले परंतु यंदाचा हंगाम हा २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थीतीत होणार आहे. चेन्नईचा सर्वात महागडा गोलंदाज दिपक हुडा हा दुखापतग्रस्त आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT