विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान? चाहत्यांकडून ट्विटरवर टीकास्त्र (पहा Video) Saam Tv
Sports

विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान? चाहत्यांकडून ट्विटरवर टीकास्त्र (पहा Video)

राष्ट्रगीत सुरु असताना विराट कोहलीचे लक्ष कुठेय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) एका कृत्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. विराट कोहलीच्या या कृतीवर सर्वजण त्याच्यावर भडकलेले दिसून येत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) तिसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यापूर्वी विराट कोहलीने राष्ट्रगीतामध्ये (National Anthem) असे काही केले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि राग अनावर झाला आहे. (Virat Kohli Insult to national anthem Viral Video)

कोहलीच्या या कृत्यामुळे चाहते संतापले

खरंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान विराट कोहली एक कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहली च्युइंगम चघळताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

पहा व्हिडीओ-

राष्ट्रगीतादरम्यान ही कृती;

राष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. या मालिकेसह विराट कोहलीने खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडले आहे. अशा परिस्थितीत कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर विराटचा हा प्रकार चाहत्यांना अजिबात आवडला नाही. विराट कोहलीच्या चुकीमुळे चाहते आणि टीकाकार नाराज झाले. यानंतर लोकांनी बीसीसीआयकडे (BCCI) विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली.

टीम इंडियाचा क्लीन स्वीप

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून तिसऱ्या वनडेतही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 3-0 असा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री कोमट पाण्यात 'हा' एक पदार्थ मिक्स करून प्या अन् चमत्कार पाहा

7/12 Utara: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update : Kolhapur: अंबाबाई भक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

SCROLL FOR NEXT