radhika yadav tennis player x
Sports

Shocking : भारतीय टेनिसपटूची राहत्या घरात हत्या, जन्मदात्या वडिलांनीच गोळ्या झाडून पोटच्या पोरीला संपवलं

Crime News : क्रीडा विश्वातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका २५ वर्षीय भारतीय टेनिसपटूचा खून झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे टेनिसपटूच्या वडिलांनीच तिची हत्या केली आहे.

Yash Shirke

Tennis Player Death : भारतातील टेनिस जगतातून एक धक्कादायक बातमी आली आहे. एका तरुण भारतीय टेनिसपटूची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येचा आरोप तिच्या वडिलांवर करण्यात आला आहे. पोलिसांनी टेनिसपटूच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे क्रिडा विश्वात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हरियाणाच्या गुरुग्राममधील सुशांत लोक फेज-२ या पॉश सोसायटीमध्ये घडली आहे. या सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक E-157 मध्ये २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादव तिच्या कुटुंबीयांसह राहत होती. राधिकावर तिच्या राहत्या घरात गोळ्या झाडण्यात आल्या. यात राधिकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गुरुग्राम पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली.

राधिका यादवच्या वडिलांनीच तिच्यावर गोळ्या झाडल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली राधिकाच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घडलेली घटना भीषण असल्याने पोलिसांनी ताबडतोब तपास सुरु केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हत्येचे कारण व्हिडीओ, रील्स असल्याचे म्हटले जात आहे.

राधिकाच्या वडिलांना तिचे सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणे आवडत नव्हते. यावरुनच त्यांना राधिकाचा खूर राग आला होता. रागाच्या भरात त्यांनी थेट राधिकाचा जीव घेतला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गुरुग्राम पोलिसांनी राधिका यादवच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीत पाच हजारांची अग्रीम मदत शेतकऱ्यांसाठी ठरली दिलासादायक

Dental Care : मोत्यासारखी चमक अन् मजबूत दात, घरच्या घरी बनवा केमिकल-फ्री हर्बल टूथपेस्ट

Gold Rate : लक्ष्मीपूजनानंतर सराफा बाजारात उलथापालथ! सोन्याच्या दरात प्रतितोळा १०३० रुपयांचा बदल; पाहा आजचे ताजे दर

Fire Tragedy : मध्यरात्री भीषण अग्नितांडव! एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू

Gautami Patil : गौतमी पाटीलचा दिवाळी लूक पाहिलात का? लाल साडीत खुललं सौंदर्य | PHOTOS

SCROLL FOR NEXT