India vs South Africa Hockey News saam tv news
Sports

Hockey News: भारतीय संघाचा मोठा कारनामा! घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला ३-० ने लोळवलं

India vs South Africa Hockey News: भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. यादरम्यान भारतीय संघाकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa Hockey News:

भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. यादरम्यान भारतीय संघाकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेवर ३-० ने विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून हरमनप्रीत सिंग, सुमित आणि अभिषेकने गोल केले.

या सामन्याची सुरुवात पेनल्टी कॉर्नरने झाली. सामन्यातील दुसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीतने नेट्सच्या मागणं ड्रॅग फ्लीप मारत संघाला आघाडी मिळवून दिली. या सामन्यातील पहिला हाल्फ संपायला काही मिनिटं शिल्लक असताना अभिषेकने दक्षिण आफ्रिकेचा डिफेन्स फोडून काढत गोल केला आणि संघाला २ गोलची आघाडी मिळवून दिली.

सामन्यातील दुसऱ्या हाल्फमध्ये दक्षिण आफ्रिकेने अनेकदा आक्रमण केलं. मात्र भारतीय डिफेन्सने त्यांना गोल करण्यापासून रोखलं. दुसऱ्या हाल्फच्या सुरुवातीलाच सुमितने गोल करत भारतीय संघाला ३-० ची आघाडी मिळवून दिली. (Sports News In marathi)

भारतीय संघाने ३-० ची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली. मात्र ते भारतीय डिफेन्सला फोडून गोल करु शकले नाहीत. यासह भारतीय संघाने या सामन्यात ३-० ने विजय मिळवला. दरम्यान भारतीय संघाचा पुढील सामना २८ जानेवारी रोजी आयर्लंड संघाविरुद्ध रंगणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीस-शिंदे-पवारांनी निवडणुकीत १५ हजार कोटी उडवले; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा कोणी केला?

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे माजी नगरसेवक, नेते अजित पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : ईव्हीएम मशीनमध्ये घोळ; निवडणूक निकालानंतर ७ कर्मचाऱ्यांचं निलंबन

Biscuit Pudding Recipe: ख्रिसमससाठी बनवा स्पेशल बिस्किट पुडिंग, लहान मुलं होतील खूश, वाचा सोपी रेसिपी

Christmas Saree: ख्रिसमसला कोणती साडी नसावी? लाल- पांढऱ्या साड्यांचे 'हे' पॅटर्न वापरा, दिसाल सुंदर अन् सगळ्यात हटके

SCROLL FOR NEXT