Rishabh Pant Car Accident  Saam Tv
Sports

Rishabh Pant: रिषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट, नेमके काय म्हणाले डॉक्टर?

सध्या दिल्लीमधील मॅक्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रिषभ पंतच्या उपचाराबाबत डीडीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

Gangappa Pujari

Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतचा ३० डिसेंबरच्या पहाटे अपघात झाला होता. या भीषण अपघातात रीषभ पंतच्या पाठीला, डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या दिल्लीमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याला आयसीयूमधून बाहेर शिफ्ट करण्यात आले होते. मात्र आता रिषभ पंतच्या उपचाराबाबत डीडीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष श्याम शर्मा यांनी रिषभ पंतची भेट घेतली होती. या भेटीत रिषभने या अपघाताबद्दलची आपबिती त्यांना सांगितली होती.

श्याम शर्मा यांना दिलेल्या माहितीत त्याने अपघात झोप लागल्यामुळे नाही तर रस्त्यावरील खड्यामुळे झाल्याचे सांगितले होते. या भेटीनंतर दिल्ली क्रिकेट असोशिएशनने मोठा निर्णय घेतला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हालवण्यात येणार आहे. डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. अपघातात रिषभच्या डोक्याला मार लागला आहे, पाठीवरही मोठी जखम झाली आहे. तसेच त्याच्या लिगामेंटवरही मुंबईमध्ये उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रिषभची प्रकृत्ती सध्या धोक्याबाहेर आहे. मात्र बीसीसीआयने (BCCI) त्याच्यावर चांगले उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्याला मुंबईला हलवण्यात येणार असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

SCROLL FOR NEXT