shreyas iyer twitter
क्रीडा

Shreyas Iyer अन् त्याच्या आईने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत वाचून धक्काच बसेल,पाहा PHOTO

Shreyas Iyer Buys New House In Mumbai: भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.

Ankush Dhavre

Shreyas Iyer New House: भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसून आला. या स्पर्धेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. आता तो इराणी कपमध्ये मुंबईकडून खेळताना दिसेल. मात्र यावेळी श्रेयस अय्यर चर्चेत येण्याचं कारण जरा वेगळं आहे. श्रेयस अय्यरने मुंबईत तब्बल २.९० कोटींचं आलिशान असं घर घेतलं आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, श्रेयस अय्यरने खरेदी केलेलं हे घर वरळीतील आदर्श नगरमध्ये असलेल्या त्रिवेणी इंडस्ट्रियल सीएचएसएलच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. त्याचं हे घर ५२५ स्केवर फूटचं आहे. हे घर त्याने ५५,२३८ रुपये पर स्क्वेअर फूट किमतीने खरेदी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हे घर खरेदी करण्यासाठी १७.४० लाख रुपये स्टॅम्प ड्युटीसाठी भरले. तर त्यानंतर ३० हजार रुपये रजिस्ट्रेशनसाठी दिले.

श्रेयस अय्यरने खरेदी केलेल्या घरांमध्ये आणखी एक आलिशान घराची भर पडली आहे. याआधीही त्याने मुंबई आलिशान घर खरेदी केले आहेत. ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्याने २०२० मध्ये मुंबईतील लोढा वर्ल्ड टॉवरमध्ये ४८ व्या मजल्यावर २३८० स्क्वेअर फूट घर खरेदी केलं होतं. या घराची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

इराणी कपमध्ये खेळणार

श्रेयस अय्यर हा भारतीय कसोटी संघातील प्रमुख सदस्य होता. मात्र आता त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्याचा फलंदाजीतील फॉर्म त्याला साथ देत नाहीये. काही दिवसांपूर्वी तो दुलीप ट्रॉफी खेळताना दिसून आला. या स्पर्धेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. काही डावात त्याला शून्यावर माघारी परतावं लागलं. मात्र आता तो मुंबईकडून इराणी कप खेळणार आहे. या स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

SCROLL FOR NEXT