Shikhar Dhawan- Ayesha Mukherjee Divorce twitter
Sports

Shikhar Dhawan- Ayesha Mukherjee Divorce: शिखर धवन आणि आयशा मुखर्जीचा घटस्फोट, वेगळे का झाले?

Shikhar Dhawan- Ayesha Mukherjee Divorce: शिखर धवनचा पत्नी आयशासोबत घटस्फोट झाला आहे.

Ankush Dhavre

Shikhar Dhawan News In Marathi:

भारतीय संघाबाहेर असलेल्या शिखर धवनच्या आयुष्यात मोठी घटना घडली आहे. शिखरचा पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस परीसरातील फॅमिली कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

पत्नी आयशाने शिखरला आपल्या मुलापासून दुर ठेऊन मानसिक छळ केल्याचही कोर्टाने मान्य केलं आहे.

या याचिकेत शिखर धवनने आयशावर गंभीर आरोप केले होते. आयशाने या सर्व आरोपांचा स्वीकार केला असून ती स्वत:चा बचाव करू शकलेली नाही. असं कोर्टाने म्हटलं आहे. शिखर धवनने आयशावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर मुलगा कोणाकडे राहणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. सध्या मुलगा आयशाकडे असून कोर्टाने शिखर धवनला आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी दिली आहे.

त्याचा मुलगा ऑस्ट्रेलियात असल्याने उचित वेळेत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची अनुमती कोर्टाने दिली आहे. तर शाळेला सुट्टी असताना कमीत कमी काळासाठी तो शिखर धवनसोबत राहण्यासाठी जाऊ शकतो, असे कोर्टाने आदेश दिले आहेत. (Latest sports updates)

१० वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशासोबत केला होता विवाह..

शिखर धवन आणि आयशा हे दोघेही २०१२ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. विवाह झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी जोरावर असं ठेवलं. आयशा ही शिखर धवनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

Thane crime : ठाण्यात गुंडांची दहशत, प्रसिद्ध डॉक्टरांच्या दवाखान्याची तोडफोड, व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT