ruturaj gaikwad and utkarsha gaikwad marriage photos instagram
Sports

Ruturaj Gaikwad Marriage: पवारांची लेक झाली गायकवाडांची सून, ऋतुराज-उत्कर्षा अडकले विवाह बंधनात!- PHOTO

Ruturaj Gaikwad And Utkarsha Pawar Marriage: या दोघांच्या विवाह सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत.

Ankush Dhavre

Ruturaj Gaikwad Marriage Photos: चेन्नईला चॅम्पियन बनवणाऱ्या ऋतुराजने आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. भले भले गोलंदाज त्याला बाद करू शकले नाही. आता महाराष्ट्राच्या ऑलराऊंडरने त्याला क्लीनबोल्ड केलं आहे.

ऋतूराज गायकवाड आणि महाराष्ट्र संघाची अष्टपैलु खेळाडु उत्कर्षा पवार हे दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत. या दोघांच्या विवाह सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत. (Ruturaj Gaikwad And Utkarsha Marriage Photos)

ऋतूराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांच्या मेहंदी सेरेमनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता विवाह होताच या दोघांचे विवाह सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. हा विवाह सोहळा महाबळेश्वर येथे पार पडला.

कोण आहे उत्कर्षा पवार ?

गेल्या काही दिवसांपासुन उत्कर्षा पवार ही प्रचंड चर्चेत आहे. पहिल्यांदा ती ऋतुराज गायकवाडच्या आयपीएल कारकीर्दितील ५० व्या सामन्यात झळकली होती. या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडने काही फोटो शेअर केले होते. या दरम्यान त्याने उत्कर्षा पवारचा फोटो देखील शेअर केला होता.

या फोटोला कॅप्शन देत त्याने हार्टचा ईमोजी शेअर केला होता. हा फोटो व्हायरल होताच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. उत्कर्षा पवार ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करते. ती देखील पुण्यात राहते. ती अष्टपैलु खेळाडु आहे. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातुन घेतली माघार..

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ७ ते ११ जुन दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड केली गेली होती.

मात्र विवाह करणार असल्याने त्याने या स्पर्धेतुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालला भारतीय संघात राखीव खेळाडु म्हणुन संधी दिली गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT