Rishabh Pant captain For India vs South Africa T-20 series saam tv
Sports

Rishabh Pant : अपघातानंतर रिषभ पंत 'इतके' दिवस मैदानाबाहेर; ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेलाही मुकणार? समोर आली माहिती

अपघातामुळे त्याला क्रिकेटपासून बराच काळ लांब राहावे लागणार आहे, ज्यामध्ये तो आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये तो खेळेल का याबद्दलही साशंकता निर्माण केली जात आहे.

Gangappa Pujari

Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतच्या भीषण अपघाताने क्रिडाविश्वात खळबळ माजली आहे. शुक्रवार( ३०, डिसेंबर) दिल्लीहून डेहराडूनकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिषभ पंतच्या या अपघातामुळे त्याला क्रिकेटपासून बराच काळ लांब राहावे लागणार आहे, ज्यामध्ये तो आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये तो खेळेल का याबद्दलही साशंकता निर्माण केली जात आहे.

क्रिकेटपटू रिषभ पंतच्या भीषण अपघातानंतर त्याच्या उपचाराची जबाबदारी बीसीसीआयने घेतली आहे. त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत. रिषभच्या या अपघातानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

रिषभ पंतच्या प्राथमिक तपासात एक्सरेमध्ये फ्रॅक्चर झाल्याचे आढळले नाही परंतु तरीही त्याला बराच काळ क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे. बीसीसीयच्या (BCCI) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा काळ सहा महिन्यांपर्यंतचाही असू शकतो.

दरम्यान, रिषभ पंतला (Rishabh Pant) लवकरच मुंबईत आणले जाणार असून त्यानंतर तो बोर्डाच्या डॉक्टरांकडून उपचार घेईल. पंतच्या या भीषण अपघातानंतर क्रिडाविश्वातूनही अनेकांनी सोशल मीडियावरुन त्याच्या तब्बेतीची विचारपूस केली होती. नववर्षाच्या पुर्वसंधेला आईला भेटायला जात असताना रिषभचा हा अपघात घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये सूर्य कोपला, पारा 46 अंशावर

"जय महाराष्ट्र, मराठी माणूस थांबता कामा नये..."; Bigg Boss फेम अभिनेत्याची मोठी घोषणा

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; झटपट हे काम कराच अन्यथा पगार मिळणार नाही

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा झटका; ७ खासदारांच्या भाजप प्रवेशाला मंजुरी, सत्ताधाऱ्यांची ताकद आणखी वाढणार

Mumbai News: बिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर, एकाच कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद मृत्यू

SCROLL FOR NEXT