cricketers death news  saam tv news
Sports

Indian Cricketer Hoysala K Death : भारताच्या युवा क्रिकेटपटूचं सामन्यानंतर निधन, क्रीडाविश्वावर शोककळा

K Hoysala dead at 35: : क्रीडाविश्वातून दु:खद घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या सुहैब यासीनचं निधन झाल्याची घटना घडली. त्यानंतर आणखी एका युवा खेळाडूचं निधन झालं आहे.

Vishal Gangurde

Indian Cricketer Dies After Match:

क्रीडाविश्वातून दु:खद घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील सुहैब यासीनचं निधन झाल्याची घटना घडली. त्यानंतर आणखी एका युवा खेळाडूचं निधन झालं आहे. होएसाला के असं या खेळाडूचं नाव आहे. कर्नाटकातील होएसाला के याच्या निधनानंतर क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

कर्नाटकातील आरोग्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक

३५ वर्षीय क्रिकेटर होएसाला के याचं निधन झाल्यानंतर कर्नाटकातील आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलं की,'कर्नाटकातील खेळाडूच्या मृत्यूच्या वृत्ताने दु:ख झालं. एजिस साऊथ झोन स्पर्धेदरम्यान जलद गोलंदाज होएसाला के याच्या मृत्यूची घटना घडली आहे. मी त्याचे मित्र आणि कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतो. कार्डियाक अरेस्टमुळे त्याचा मृत्यू झाला आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मित्र अभिमन्यू मिथूने व्यक्त केलं दु:ख

भारताचा माजी क्रिकेटपटू अभिमन्यू मिथून यानेही पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं. अभिमन्यूने पोस्ट करत म्हटलं की, 'मी कधीही विचार केला नव्हता की, असं काही लिहायची वेळ येईल. आपण चांगला माणूस गमावला आहे. तो एक चांगला क्रिकेटपटू होता. एक चांगला काळजी घेणारा मित्र होता. तसेच एक चांगला मुलगा होता. होएसाला के खूप लवकर जग सोडून गेला. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. Rest in peace Hoysi!'.

'होएसाला के'चं निधन कसं झालं?

'होएसाला के'च्या विषयी बोलायचं झालं तर तो बेंगळुरुमध्ये तामिळनाडूच्या विरोधात संघासोबत बैठकीत बोलत होता. त्यानंतर तो जेवण करायला गेला. त्याचवेळी अचानक त्याच्या छाती दु:खू लागलं. त्यानंतर अचानक तो बेशुद्ध झाला. त्यामुळे तातडीने त्याला जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्याला उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही सर्व घटना २२ फेब्रुवारीची आहे. ही सर्व घटना २३ फेब्रुवारीला समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

SCROLL FOR NEXT