indian cricketer brother in law  Saam tv
Sports

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या जवळच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

indian cricketer brother in law : भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या जवळच्या व्यक्तीने आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

चेतेश्वर पुजाराच्या मेहुण्याने आयुष्य संपवलं

जीत रसिखभाई पाबरी असे आत्महत्या केलेल्या मेहुण्याचे नाव

मेहुण्याने तणावातून आयुष्य संपवल्याचे कारण समोर

भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या मेहुण्याने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेहुण्याने आयुष्य संपवल्यानंतर त्याच्या कुटुंबामध्ये एकच खळबळ उडाली. जीत रसिखभाई पाबरी असे आत्महत्या केलेल्या मेहुण्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने तणावात होता.

जीत रसिखभाई पाबरीच्या विरोधात एक्स-फियान्सीने अत्याचाराचा गुन्हा नोंदवला होता. तिने मालवीय नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर तणावात येत आयुष्य संपवल्याचे कारण समोर आलं आहे.'लग्न ठरल्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र त्यानंतर त्याने लग्न मोडले, असा एक्स-फियान्सीचा आरोप आहे.

चेतेश्वर पुजाराची सासरवाडी ही जमजोधपूर येथे आहे. मात्र, त्यांचे कुटुंब मागील २० वर्षांपासून राजकोटमध्ये राहत आहे. सासरवाडीतील कुटुंब एका कारखान्याचे मालक आहेत. चेतेश्वर पुजाराच्या पत्नीचं नाव पूजा आहे. तिला एक छोटा भाऊ आणि लहान बहीण आहे. पूजाचा जन्म हा गोंडल येथे झाला. तिने दहावीपर्यंत शिक्षण सोफिया शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर ११-१२ पर्यंत शिक्षण हे अहमदाबामध्ये केलं. तर तिने मुंबईतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

चेतेश्वर पुजारा देखील मूळचा राजकोटचा आहे. त्याने या वर्षी ऑगस्ट महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने २०२३ मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. मेहुण्याने आयुष्य संपवल्याने चेतेश्वर पुजारा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT