Indian cricket team wins against zimbabwe saam tv
Sports

Indian Cricket Team : टीम इंडियाची विजयी आघाडी, झिम्बाब्वे विरुद्ध दुसऱ्या वनडेतही सरशी

झिम्बाव्बेने आजच्या सामन्यात भारतापुढे १६२ धावांचं आव्हान ठेवलं होतं, त्यानंतर...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारताने झिम्बाब्वे विरुद्ध हरारेमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने झिम्बाब्वे विरोधात २-० ने आघाडी घेत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर (India vs Zimbabwe) शिक्कामोर्तब केले आहे. झिम्बाव्बेने आजच्या सामन्यात भारतापुढे १६२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, टीम इंडियाने पुन्हा एकदा झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत सामना पाच विकेट्सने जिंकला.

भारताचे आक्रमक फलंदाज दीपक हुड्डा आणि संजू सॅमसन यांनी चमकदार कामगिरी करत या सामन्यात विजयाला गवसणी घातली. टीम इंडियाची (Indian cricket team) सुरुवात संथ गतीने झाल्यानंतर हुड्डा आणि सॅमसनने विजयी भागिदारी करत कमान सांभाळली. टीम इंडीयाने या सामन्यात पहिले चार विकेट्स अवघ्या ९७ धावांवर गमावले. त्यांनतर हुड्डा आणि सॅमसने ५६ धावांची भागिदारी करत भारताची विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु ठेवली. दीपक हुड्डा बाद झाला पण संजूने शेवटच्या षटकापर्यंत बाजी लावली.

या सामन्यात शिखर धवनच्या सोबत कर्णधार के एल राहुल (K L Rahul) सलामीसाठी मैदानात उतरला होता. परंतु, त्याला फक्त एकच धाव काढता आली. शिखरने ३३ धावांची खेळी साकारली. तर शुभमन गिलनेही ३३ धावा केल्या. टीम इंडियाचा युवा फलंदाज ईशान किशन सहा धावा करून बाद झाला. भारताच्या या दणदणीत विजयानंतर झिम्बाब्वे विरोधात भारताने २-० ने आघाडी घेतलीय. टीम इंडियाने पहिला सामना १० विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना २२ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT