rohit sharma saam tv news
Sports

Rohit Sharma Record: पहिल्याच टी -२० सामन्यात रोहितला इतिहास रचण्याची संधी! असा रेकॉर्ड करणारा ठरेल जगातील नंबर १ कर्णधार

Rohit Sharma Record News In Marathi: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माला मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

India vs Afghanistan T20I Series:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा हिटमॅन नावाने ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी झालेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत त्याने आपल्या नावावर सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. आता भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माला मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी रोजी पार पडणार हे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत कर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये ८२ षटकार मारले आहेत.

कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन अव्वल स्थानी आहे.त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत एकूण ८६ षटकार मारले होते. या यादीत रोहित दुसऱ्य स्थानी आहे. (Latest sports updates)

टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सुपरहिट..

रोहित शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये सुपरहिट ठरला आहे. रोहितने आतापर्यंत १४८ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १८२ षटकार मारले आहेत. तसेच वनडेत फलंदाजी करताना त्याने २६२ सामन्यांमध्ये ३२३ षटकार मारले आहेत.

तसेच त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ५४ कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ७७ षटकार मारले आहेत. आयपीएल स्पर्धेतही त्याची बॅट जोरदार तळपली आहे. या स्पर्धेतील २४३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने २५७ षटकार मारले आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये करणार कमबॅक..

रोहित शर्मा २०२२ टी-२० वर्ल्डकप आपला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याने टी-२० क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. नुकताच अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघात रोहित शर्मालाही स्थान देण्यात आलं आहे. रोहित शर्मासह विराट कोहलीदेखील कमबॅक करताना दिसून येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी,दुसरा सामना १४ जानेवारी आणि मालिकेतील तिसरा टी-२० सामना १७ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT