Mohammed Shami saam TV
Sports

शेवटच्या षटकात घेतल्या 4 विकेट्स अन् ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास, भारताचा दणदणीत विजय

आज झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : टी-20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरू झाली असून टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान विरोधात 23 ऑक्टोबरला होणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाने (Team India) वॉर्म अप मॅचमध्ये चमकदार कामगिरी केलीय. आज झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा चार सहा धावांनी पराभव केला.

भारताने प्रथम फलंदाजी करत 186 धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करत विजयाच्या दिशेनं वाटचाल केली होती. पण,शेवटच्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) भेदक मारा केला अन् ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. ऑस्ट्रेलियाचा संघ 180 धावांवर गारद झाल्याने भारताचा विजय झाला. (India won against Australia in warm up match T20 world cup 2022)

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण भारताने या सामन्यात एक मोठी रणनीती आखली आणि संपूर्ण गेम पालटला. रोहित शर्माने मोहम्मद शमीला शेवटचं षटक दिलं. शमीने या षटकात अप्रतिम कामगिरी करत चार विकेट्स घेतले आणि भारताला विजय संपादन करून दिलं. ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असतानाच शमीनं भेदक गोलंदाजी करून फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

मोहम्मद शमीचं 20 वं षटक

पहिला चेंडू : 2 धावा

दूसरा चेंडू : 2 धावा

तिसरा चेंडू : पॅट कमिन्स आऊट

चौथा चेंडू : एश्टन असगर रन आऊट

पाचवा चेंडू : जोश इंग्लिस आऊट

सहावा चेंडू : केन रिचर्डसन आऊट

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने या सामन्यात 76 धावांची धडाकेबाज खेळी केली. या इनिंगमध्ये त्याने 7 चौके आणि 3 षटकार ठोकले. मिचल मार्शने 35 तर ग्लेन मॅक्सवेलने 23 धावांची खेळी केली. दरम्यान, टीम इंडियाचा गोलंदाज भूवनेश्वर कुमारने 2, अर्शदीप,हर्षल आणि चहलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. तर मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात तीन विकेट्स घेवून भारताला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT