INDW VS PAKW Saam Tv
Sports

INDW VS PAKW : पाकिस्तान संघाची तेज तर्रार सुरुवात, भारताला विजयासाठी १५० धावांचे आव्हान

INDW VS PAKW: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. साखळी फेरीतील चौथा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Saam TV News

INDW VS PAKW: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेला (Icc womens T-20 World Cup) जोरदार प्रारंभ झाला आहे. साखळी फेरीतील चौथा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद १४९ धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाला विजयासाठी १५० धावांची गरज आहे. (Latest Sports Updates)

पाकिस्तान संघाकडून फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी जावेरिया खान आणि मुनीबा अली यांची जोडी मैदानावर आली होती.या दोघांकडून पाकिस्तान संघाला चांगली सुरवात करून देण्याची अपेक्षा होती. मात्र दोघेही स्वस्तात माघारी परतले.

जावेरिया खान ८ तर मुनीबा अली १२ धावा करत माघारी परतली. त्यानंतर कर्णधार बिस्मा मारूफने जबाबदारी स्वीकारत फलंदाजी केली. तिने या डावात नाबाद ६८ धावा केल्या. तर आयशा नसीमने ४३ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाला २० षटक अखेर ४ गडी बाद १४९ धावा केल्या.

तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, राधा यादवने २१ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकारने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष(विकेटकिपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग

पाकिस्तान – जावेरिया खान, मुनीबा अली (विकेटकिपर), बिस्मा मारूफ (कर्णधार), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT