Women’s Asia Cup 2026: India Crowned Champions After Crushing Sri Lanka by 72 Runs saam tv
Sports

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

India vs Sri Lanka Women’s Asia Cup Final: एसीसी महिला आशिया चषक २०२६ चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कमाल दाखवत भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं.

Bharat Jadhav

भारताने आठव्यांदा महिला आशिया कपच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ७२ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ गडी गमावून १८३ धावा केल्या. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकांत १११ धावांवर ऑलआऊट झाला.

एसीसी महिला आशिया कप २०२६ चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि शानदार कामगिरी करत २० षटकांत ५ गडी बाद १८३ धावा केल्या होत्या. शेफाली वर्माने ६८ धावा आणि स्मृती मंधानाने ५९ धावा केल्या. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. गोलंदाजीत श्री चरणीने ४ बळी, तर दीप्ती शर्माने ३ बळी घेतले.

भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषक जिंकला

१८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. इमेषा दुलानी अवघ्या ४ धावांवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर, कर्णधार चमारी अथापथ्थूने ३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि विश्मी गुणरत्नेनेही २० धावा केल्या. मात्र, या दोघींची फलंदाजी संथ होती, जी संघाला महागात पडली.

त्यानंतर डावाच्या अखेरीस निलाक्षी डी सिल्वानेही २२ धावांचे योगदान दिले. दरम्यान श्रीलंकेचा संघ २० षटकांत केवळ १११ धावा करू शकला. लंकेनं आपल्या सर्व १० विकेट्स गमावल्या. श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाचा या सामन्यात ७२ धावांनी पराभव झाला. भारतीय महिला संघाकडून श्री चरणीने ४ बळी घेतले, तर दीप्ती शर्माने ३ बळी मिळवले. यासह क्रांती गौड, शफाली वर्मा आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या विजयासह भारतीय संघाने आठव्यांदा महिला आशिया चषक जिंकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

SCROLL FOR NEXT